पडळकर यांच्या विजयात ‘रिपाइं’चा वाटा : विकास साबळे

0
7

जत : जत विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप महायुतीचे उमेदवार गोपीचंद पडळकर मताधिक्याने विजय झाले. त्यांनी जत तालुक्यामध्ये सर्व मित्रपक्षांना सोबत घेऊन विकास कामांसाठी भरघोस निधी दिला. त्यामुळे रिपाइंने पाठिंबा दिल्याने या विजयात रिपाइंच्या कार्यकर्त्यांचा वाटा असल्याची माहिती जिल्हा उपाध्यक्ष विकास साबळे यांनी दिली.

जत शहर व तालुक्यात विविध विकास कामांना मंजुरी मिळवून दिली असून येणाऱ्या पाच वर्षाच्या कालावधीत जत तालुक्याचा चेहरा मोहरा बदलून विकास मॉडेल जनतेच्या डोळ्यासमोर ठेवण्याबरोबर मतदार व वंचित घटकापर्यंत पोहचवण्याचे काम केल्याने जत तालुक्यातील जनतेने मतदान केले.

महायुतीचा घटक पक्ष रिपाइं आठवले गट प्रदेश सचिव संजय कांबळे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील प्रत्येक गावात रिपाइंच्या कार्यकर्त्यांना समक्ष भेटून पडळकर यांच्या विजयासाठी विकासपुत्र समजावून सांगण्याचे काम संजय कांबळे व त्यांच्या पदाधिकारी,कार्यकर्ते प्रामाणिकपणे केले.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here