नॉन कोविड रुग्णासाठी वरदान ठरलेले जतमधील ‘पंतगे हॉस्पिटल’

0जत,संकेत टाइम्स : सध्या सर्वत्र कोरोना महामारीने हाहाकार माजविला आहे.

सातत्याने कोरोनाचा विळखा घट्ट होत आहे. प्रशासन व आरोग्य यंत्रणा ही रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी रात्रदिवस काम करित आहे.

मास्क,सोशल डिस्टसींग आणि साबण,सँनिटायझर स्वच्छता ही त्रिसूत्री आता प्रत्येकजण अंगिकारत आहे.त्याशिवाय लसीकरण,लॉकडाऊन अशा अनेक प्रकारे शासन कोरोना रोकण्यासाठी प्रयत्नाची पाराकाष्ठा करत आहे.कोरोना रुग्णावर उपचार करण्यास खाजगी डॉक्टरांना डॉक्टरांना परवानगी नाही.


त्यामुळे अशी लक्षणे घेऊन रुग्ण आल्यास डॉक्टरांनी त्यांची वर्दी शासकीय यंत्रणा,शासकीय रुग्णालयास द्यावयाची व रुग्णांना तेथे पाठवयाचे आहे.अशावेळी

रक्तदाब,मघुमेह,डोकेदुखी,पोटदुखी,सांधेदुखी,उलटी,ताप,मुतखडा,लैगिंक समस्या अशा नॉन कोविड आजारावर उपचारासाठी जत येथील आंबेडकर नगर मधील ‘पतंगे हॉस्पिटल’ हे वरदान ठरत आहे.  या धर्तीवर पंतगे हॉस्पिटलचे संचालक डॉ.राजेश पंतगे म्हणतात,माझे रुग्णालय सर्व प्रकारच्या पेशंटसाठी 24 तास सेवा देत आहे.आम्ही नवजात बालकापासून ते वृध्दापर्यतच्या सर्व आजारावर उपचार करत आहोत.कोरोनाची पहिली लाट व आताची दुसरी लाटेत आमचे हॉस्पिटलमध्ये भिती न बाळगत येणाऱ्या प्रत्येक रुग्णावर उपचार करण्यात येत आहेत.कोविड 19 वगळता इतर सर्व आजारावर उपचार आमच्याकडे करण्यात येत आहेत.

Rate Card

त्याशिवाय प्रशिक्षित कर्मचाऱ्यांकडून प्रत्येक रुग्णांची काळजी घेत आहोत.कोरोनामुळे अडचणीतील सर्व रुग्णांना अल्प दरात सध्या उपचाराच्या सर्व सुविधा आमच्या हॉस्पिटल मध्ये उपलब्ध आहेत.रुग्णांना मानसिक आधार,कमीतकमी औषधे,पथ्यपाणीची जोड देऊन उपचार केले जात आहेत.तसचे प्रत्येक रुग्णाला निसर्गा बरोबर सुसंबंध्द पाहून योग,प्राणायाम, चालणे,शारीरिक व्यायाम अशा साध्या साध्या पध्दतीचा वापर केला जात आहे. वेदनेने आलेला प्रत्येक रुग्ण येथून ठणठणीत बरा होऊन जावा हेच आमचे ध्येय असते.


डॉ.पंतगे म्हणाले,कोरोना त्रिसुत्री बरोबर सकात्मक  व लसीकरण हे दोन सुत्र मिळून कोरोना आपल्याला संपवून सामान्य जीवन जगण्यासाठी पुर्वीचे दिवस परत आणायचे आहेत.

कोरोना काळात स्वस्त -निरोगी आणि सकात्मक राहण्यासाठी आम्ही मोफत टेलीमेडीसिन ही सुविधा गेली वर्षभर देत आहोत.आपल्या प्रकृत्ती विषयक शंका समाधानासाठी 9822548120 हा नंबर दररोज सकाळी 10 ते 1 या वेळेत उपलब्ध असतो.मोफत मार्गदर्शनासाठी रुग्णांनी नि संकोच संपर्क साधावा,असे आवाहनही डॉ.पंतगे यांनी केले आहे.Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.