खलाटीत कामगार सेनेकडून कोरोना जनजागृत्ती
जत,संकेत टाइम्स : महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने खलाटीत कोरोना जनजागृत्ती करण्यात आली.कोरोनाचा प्रभाव कमी करण्यासाठी मास्क,सोशल डिस्टसिंग,सँनिटायझरचा वापर काटेकोर करण्याची गरज आहे,अशी माहिती कामगार सेनेचे राज्य उपाध्यक्ष दिनकर पंतगे यांनी केले आहे.
पंतगे म्हणाले,गर्दीच्या ठिकाणी न जाणे नेहमी स्वच्छ हात धुणे,सकस व पौष्टिक आहार घेणे, त्यामध्ये सकाळी गरम पाणी पिणे, दिवसातून दोन ते तीन वेळा मिठाच्या पाण्याने गुळण्या करणे, तद्नंतर गूळपाणी घेणे सकाळी मोकळ्या हवेत अर्धा तास व्यायाम करणे व अर्धा तास प्राणायाम करणे यामध्ये भस्त्रिका,
अनुलोमविलोम,कपालभाती, सुदर्शन क्रिया,असे प्राणायाम प्रकार करणे आवश्यक आहे.सुदर्शन क्रिया मुळे हृदय आणि फुफ्फुस मजबूत होते. उत्साह वाढतो आत्मविश्वास वाढतो. शरीरामध्ये एक प्रकारची प्रेरणा शक्ती निर्माण होते. सकाळी व्यायाम प्राणायाम झाले नंतर आंघोळ केल्यानंतर पुरेसा नाश्ता करावा. त्यानंतर नेहमीप्रमाणे आपली कामे करावीत. दुपारी साडेबारा ते दोन या दरम्यान जेवण करावे,जेवणामध्ये सकस व पौष्टिक आहार असावा दिवसभर सकारात्मक विचार करावा सायंकाळी आठ ते नऊ या वेळेत जेवण करावे रात्री झोपताना दुधामध्ये थोडीशी साखर व हळद टाकून ते गरम करून प्यावे अशा पद्धतीने एकात्मिक कोरोना रोग नियंत्रण

व्यवस्थापन करावे म्हणजे आपण खात्रीशीर कोरोना वर मात करू शकतो. मनामध्ये कुठल्याही प्रकारची भीती बाळगू नये.यावेळी कोरोना पेशंट ना पोस्टीक आहार म्हणून केळी आणि अंड्याचे वाटप केले,तसेच त्यांना मास्कचे वाटप केले.यावेळी अवजड वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष तात्या कोळी,महाराष्ट्र कामगार सेनेचे शाखाप्रमुख अब्बास मुजावर,तानाजी शिंदे व त्यांचे कार्यकर्ते यांच्या शुभहस्ते मास्क फराळाचे वाटप केले.
खलाटीत कामगार सेनेकडून पोषक आहाराचे वाटप करण्यात आले.
