संख : येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी रावसाहेब विठ्ठल कोट्याळ, तर उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर विठ्ठल बिराजदार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सहायक निबंधक जत तथा निवडणूक निर्णय अधिकारी अमोल डफळे यांच्या अध्यक्षतेखाली सोसायटी सभागृहात आयोजित सभेत निवड प्रक्रिया झाली.
संख विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे अध्यक्ष-उपाध्यक्षांचा एक-एक वर्षाचा कार्यकाल संपल्याने त्यांनी राजीनामा दिला होता. या रिक्त जागी मासिक सभेत अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाचा अर्ज मागविण्यात आला होता.या सभेवेळी अध्यक्षपदासाठी रावसाहेब कोट्याळ, तर उपाध्यक्षपदासाठी ज्ञानेश्वर बिराजदार यांची प्रत्येकी एक अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी अमोल डफळे यांनी त्यांची नावे घोषित केली. यावेळी सुभाष पाटील, मलगोंडा बिराजदार, मैनुद्दीन जमादार, यल्लाप्पा बिराजदार उपस्थित होते.