डफळापूर : येथील श्रीपती शुगर अँण्ड पॉवर लि,डफळापूर-कुडणूर कारखान्यास १५ डिसेंबर २०२४ अखेर गाळपास आलेल्या उसाचे बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर एकरकमी जमा केले आहे.चालू हंगामासाठी कारखान्याने साडे चार लाख टनाचे उदिष्ट ठेवले असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक महेंद्र आप्पा लाड यांनी दिली. यावेळी भारती शुगर्सचे चेअरमन ऋषिकेश लाड उपस्थित होते.
यावेळी महेंद्र आप्पा लाड यांनी यावर्षी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या सहकार्याने साडे चार लाखाचा टप्पा पूर्ण करणार आहे. जत व कवठे महांकाळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विकास व उन्नतीमध्ये श्रीपती शुगर नेहमीच बरोबर राहील तसेच श्रीपती शुगर नेहमीच शेतकरी बांधवांच्या हिताशी कटिबद्ध असून यापुढील काळात उसाचे उत्पन्न वाढीकरिता शेतकरी बांधवाना कारखान्याच्या शेती विभागामार्फत मार्गदर्शनही केले जाणार आहे. १ डिसेंबर ते १५ डिसेंबर अखेरचे ऊस बिल शेतकऱ्यांच्या बँकेत जमा केले असून ऊस उत्पादकांनी संबंधित बँकेशी संपर्क साधावा. ज्यांची केवायसी अपूर्ण आहे त्यांनी शेती विभागाशी संपर्क साधून पूर्तता करावी व शेतकऱ्यांनी आपला ऊस श्रीपती शुगरला देऊन सहकार्य करावे व गळीत हंगाम यशस्वी करावा असे आवाहन श्री लाड यांनी केले .
यावेळी जनरल मॅनेजर श्री.महेश जोशी, शेती अधिकारी सतीश मिरजकर, चिफ इंजिनिअर श्री यशवंत जाधव, चिफ केमिस्ट श्री दिपक वाणी, इलेक्ट्रीकल इंजिनिअर श्री आनंदा कदम, एच.आर. मॅनेजर श्री.रणजीत जाधव यांचे सह सर्व अधिकारी उपस्थित होते.