डॉ.आरळी हॉस्पिटलमधील केरळा थेरपी सेंटर रुग्णांसाठी वरदान

0
224

आ. गोपीचंद पडळकर : जतमध्ये उद्घाटन

जत : प्रसिद्ध स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. रविंद्र आरळी यांचे वैद्यकीय क्षेत्रात मोठे योगदान आहे. डॉ. आरळी यांनी आजपर्यंत हजारो यशस्वी ऑपरेशन्स केले असून रुग्णांना मोठा दिलासा दिला आहे. रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा मानून काम करणारे डॉ. आरळी यांनी जतमध्ये आरळी हॉस्पिटल, नर्सिंग कॉलेज, वैद्यकीय प्रशिक्षण देणारे कॉलेज उभारून जतचा तर मिरजेत सिनर्जी हॉस्पिटल उभारून जिल्ह्याचा नावलौकिक वाढविला आहे.

डॉ. आरळी यांनी जतमध्ये कोरोना थेरपी सेंटर सुरू केले आहे. डॉ. आरळी हॉस्पिटलमधील केरळा थेरपी सेंटर रुग्णांसाठी ठरणार वरदान असा विश्वास जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केला. डॉ. आरळी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जत येथील शांताबाई शिवशंकर आरळी हॉस्पिटलमध्ये केरळा थेरपी सेंटर सुरू करण्यात आले आहे. त्याचबरोबर दोन दिवस मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. केरळा थेरपी सेंटरचे पूजन आ. गोपीचंद पडळकर यांच्याहस्ते झाले. यावेळी डॉ. रविंद्र आरळी, डॉ. रेणुका आरळी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

आ. पडळकर म्हणाले, डॉ. आरळी यांनी दहा बेडचे हॉस्पिटल जतमध्ये भाडयाच्या जागी उभारले होते पण आज त्यांनी जे वैद्यकीय यश मिळवले आहे ते कौतुकास्पद आहे. डॉ. आरळी यांनी अन्य ठिकाणी वैद्यकीय सेवा सुरू न करता आपल्या जन्मभूमीमध्ये जतकरांची सेवा करण्याचे ठरविले यातच सारे आले. डॉ. आरळी यांनी माफक दरात सेवा दिली व आजही ते देत आहेत. डॉ. आरळी म्हणाले, जतमधील रुग्णांना बाहेरगावी जावू लागू नये यासाठी आपण कायम प्रयत्नशील असतो. कोरोना थेरपी सेंटरही सुरू करण्याचा हाच उद्देश आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here