*जत : विद्यार्थ्यांनी आपल्या मनाशी, हृदयाशी संवाद साधला पाहिजे. आपल्या मनाशी, हृदयाशी बोलायला शिका, तुम्ही ज्यावेळी स्वतःच्या मनाशी, हृदयाशी संवाद साधाल त्याचवेळी आयुष्याचा सप्तसूर जुळून येईल असे प्रतिपादन कोल्हापूर येथील ताराराणी विद्यापीठातील प्रा.जयसिंगराव सावंत यांनी केले.
ते राजे रामराव महाविद्यालय,जत येथे सांस्कृतिक विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या वतीने आयोजित “स्वामी विवेकानंद सप्ताहाच्या” उद्घाटन प्रसंगी “युवकांच्या स्वप्नातील विवेकानंद” या विषयावरती प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुरेश पाटील हे होते. यावेळी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ.शिवाजी कुलाल, माजी प्राचार्य डॉ.शिवाजीराव बिसले, माजी फिजिकल डायरेक्टर प्रा.श्रीमंत ठोंबरे, प्रा.विलास मोरे, प्रा.संभाजीराव सरक व मा.सुधीरदादा चव्हाण उपस्थित होते.
प्रारंभी सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.सतीशकुमार पडोळकर यांनी प्रास्ताविक करुन विवेकानंद सप्ताह निमित्त आयोजित उपक्रमांची माहिती दिली.सूत्रसंचालन डॉ.ज्ञानेश्वर कांबळे यांनी तर शेवटी आभारप्रदर्शन प्रा.धनंजय वाघमोडे यांनी केले. यावेळी प्राध्यापक वृंद, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वामी विवेकानंद सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना प्रा.जयसिंग सावंत व उपस्थित मान्यवर….