म्हैसाळ कँनॉलमध्ये जमीन गेलेल्या शेतकऱ्यांना भरपाई द्या : सलीम गंवडी

0जत,संकेत टाइम्स : घोलेश्वर (ता. जत) येथे म्हैशाळ उपसा सिंचन योजनेकरिता मुख्य वितरिका व लघू वितरिकेसाठी शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादित केल्या आहेत.तरी अनेक शेतकऱ्यांना या जमिनीचा मोबदला दिला नाही तो त्वरित द्यावे.दहा ते बारा वर्षे पूर्वी जमिनी अधिग्रहण करून ही अद्याप मोबदला मिळाला नाही.तरी त्वरित कार्यवाही करावी असे निवेदन आमदार विक्रमसिंह सावंत यांना अल्पसंख्यांक समितीचे अशासकीय सदस्य सलीम गवंडी यांनी दिले आहे.

Rate Cardया निवेदनात म्हटले आहे,तालुक्यात म्हैसाळ सह मुख्य कालव्याची कामे गेली दहा ते बारा वर्षांपासून सुरू आहेत. मुख्य कालव्याची खोदाई पूर्ण झाली.म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे काम सुरू असताना शेतीचे नुकसान झाले आहे. भूसंपादन केलेल्या जमिनीचा मोबदला सुद्धा मिळाला नाही.तरी या बाबीकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला देण्याचे आदेश द्यावे, अन्यथा तीव्र आंदोलन करणार असल्याचे इशारा गवंडी यांनी दिला आहे


Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.