जत : जत तालुक्यामध्ये प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत होत असलेल्या बेळोंडगी – करजगी – भिवर्गी, भिवर्गी-संख-व्हसपेठ-कोळगीरी-काराजनगी- निगडी खुर्द-वायफळ हायवे वायफळ, जत-डफळापूर-कुडणूरफाटा हायवे आणि डफळापूर – कुंभारी – कोसारी या विविध रस्ते कामाचे भूमिपूजन मान्यवरांच्या उपस्थितीत केले.यावेळी खासदार विशाल पाटील,आमदार गोपीचंद पडळकर,बाबासाहेब कोडग,नाना शिंदे,धैर्यशील सावंत याच्यांसह विविध मान्यवर उपस्थित होते.
या रस्त्यांमुळे गावांमधील वाहतूक सुलभ होईल तसेच स्थानिक नागरिकांना, विद्यार्थ्यांना, शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणात लाभ होईल. या रस्ते प्रकल्पांमुळे जत तालुक्यातील गावांमधील संपर्क वाढून वाहतूक अधिक सुलभ होईल. तसेच स्थानिक नागरिक, विद्यार्थी विशेषतः शेतकरी बांधव व व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ होईल. ग्रामीण भागाच्या प्रगतीसाठी पायाभूत सुविधांची उभारणी करण्यास नेहमीच अग्रक्रम दिला असून येणाऱ्या काळात यास आणखी गती मिळेल असे यावेळी विविध मान्यवरांनी सांगितले.