शासकीय कामात अडथळा,एकावर गुन्हा दाखल

0जत,संकेत टाइम्स : जत शहरात‌ किक्रेट खेळणाऱ्या तरूणांच्या दुचाकी जप्त करणाऱ्या होमगार्डला धक्काबुक्की केल्याप्रकरणी जत पोलीसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे.

अधिक माहिती अशी, जत शहरांमधिल जिव्हाळा पार्कजवळ होमगार्ड कोंडिबा गुलाब हुवाळे हे किक्रेट खेळणाऱ्या तरूणांना कोरोनामुळे एकत्र जमण्यास निर्बंध असल्याने मनाई केली, पोलीस पथक घटनास्थळी पोहतच किक्रेट खेळणाऱ्या तरूणांना पोलिसांनी हुसकावताच दुचाकी सोडून त्यांनी पळ काढला.जप्त दुचाकी पोलीस ठाण्याकडे आणत असताना संशयिताने अडवणूक करून धक्काबुक्की करून दुचाकी घेऊन पलायन करत शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.