जतेत इन्सान फाउंडेशन,रिलायन्स ग्रुपकडून किराणा साहित्याचे वाटप
जत,संकेत टाइम्स : इन्सान फाउंडेशन व रिलायन्स ग्रुपच्या वतीने जत शहरातील गरीब,गरजू नागरिकांना किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले.आमदार विक्रमसिंह सांवत यांच्याहस्ते या वस्तूच्या किटचे वाटप करण्यात आले.
सामाजिक बांधिलकी जपत गरीब,गंरजूना रिलायन्स ग्रुपकडून हि मदत देण्यात येत आहे.
यावेळी आम्ही जतकरचे प्रमुख तथा कॉग्रेसचे कार्याध्यक्ष नाना शिंदे,गुगवाडचे संरपच महादेव अंदानी,विनय अय्यंगार,विकास माने,सनी महाजन,निलेश बामणे,दिलीप धोत्रे,महेश गुरव,वसीम अत्तार,उपस्थित होते.

नाना शिंदे म्हणाले,कोरोना लॉकडाऊन मुळे अनेक गरीब,मजूर नागरिकांचे हाल सुरू आहेत.त्यांना अशा मोठ्या उद्योग समुहाकडून मदत मिळवून देऊन आधार देण्यासाठी आम्ही जतकर ग्रुप येत्या काळात प्रयत्न करत राहिल.
इन्सान फाउंडेशन व रिलायन्स ग्रुपच्या वतीने गरजू नागरिकांना किराणा साहित्याचे आमदार विक्रमसिंह सावंत यांच्याहस्ते वाटप करण्यात आले.
