सोनलगीत वाळू तस्करीतील ट्रँक्टर पकडला

0उमदी,संकेत टाइम्स : सोनलगी ता.जत येथील बोर नदीपात्रात उमदी पोलीस ठाणे व महसूल विभागाकडून करण्यात आलेल्या छापामारीत एक ट्रँक्टर पकडण्यात आला.

बोर नदीपात्रात वाढलेल्या वाळू तस्करीच्या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी प्रंशात आवटे यांच्या आदेशावरून अप्पर तहसीलदार हणणंत म्हेत्रे  यांच्या पथकाने रवीवारी सायकांळी ही छापामारी करण्यात आली.


सोनलगी नजिकच्या बोर नदी पात्रात ट्रँक्टरमध्ये वाळू भरण्यात येत असल्याचे पथकाला आढळून येताच त्यांनी ट्रँक्टरचा पाठलाग केला त्यावेळी ट्रँक्टर चालकांनी ट्रँक्टर पळवून नेहण्याचा प्रयत्न केला.त्यात तस्करांनी पाडलेल्या खड्डयात ट्रँक्टर अडकला,सुदैवाने अपघात होता होता वाचला.
दरम्यान सोनलगी,सुसलाद,उमदी,

हळ्ळी बालगाव,करजगी,भिवर्गी,संख ते दरिबडची पर्यत वाळू तस्कर बोर नदीला  ओरबडत आहेत.अशा एका कारवाईने वाळू तस्करी रोकने शक्य नाही.


Rate Card

मंडल अधिकारी करतात काय?


उमदी जवळच्या सोनलगी,सुसलाद गावातील नदी पात्रात थेट मंडल अधिकारी वाळू तस्करांना पाठिशी घालत असल्याचे आरोप होत आहेत.त्यांच्या अर्थपुर्ण सहयोगाने दररोज 100 ट्रँक्टर वाळू या नदीपात्रातून काढली जात असतानाही एकाद्या ट्रँक्टरवर कारवाई करून महसूलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या डोळ्यात वाळू घालण्याचा प्रकार होत असल्याची चर्चा आहे.सोनलगीत वाळू तस्करी करताना पकडलेला ट्रँक्टर

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.