अवैध गौण खनिज प्रकरणातील वाहनाच्या सुरक्षेसाठी कोतवालासोबत पोलीस संरक्षण द्या : तहसीलदारांना निवेदन

0जत,संकेत टाइम्स : अवैध गौण खनिज वाहतूकीतील जप्त वाहनाच्या सुरक्षेसाठी नेमलेल्या कोतवालांच्या सुरक्षेसाठी वरिष्ठ अधिकारी व पोलीस बंदोबस्त द्यावा,अशी मागणी कोतवाल संघटनेचे तालुकाध्यक्ष सुभाष कोळी यांनी अप्पर तहसीलदार हणमंत म्हेत्रे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे, अवैध गौण खनिज प्रकरणी अप्पर तहसील कार्यालयाकडून जप्त केलेल्या वाहनाची शासन आदेशानुसार सुरक्षा करण्यासाठी मल्लाप्पा विठोबा कोळी,दरिबडची व निंगाप्पा मल्लेशी मादर,गिरगाव यांना नियुक्त केले आहे.
Rate Cardकोतवाल कर्तव्य बजावत असताना मंगळवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास 10 ते 15 अज्ञात इसमांनी कार्यालय परिसरातील वाहनाच्या ठिकाणी प्रवेश करत जेसीबी जबरदस्तीने‌ चालू करून पळवून नेहण्याचा प्रयत्न केला.याला विरोध करत याबाबतची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना‌ देऊनही त्यांनी प्रतिसाद दिला नाही.कार्यालयातील कर्मचारी कामराज विठ्ठल कोळी यांना माहिती दोताच.कोळी व त्यांच्या घरातील सात-आठ जण येताना बसून जेसीबी नेहणारे संबधित बंद करून वाहन सोडून पळून गेले आहेत.अशा घटना कोतवालच्या जिवावर बेतू शकतात.त्यामुळे सुरक्षेसाठी नेमलेल्या कोतवाला सोबत वरिष्ठ अधिकारी व पोलीसांची नेमणूक करावी,अशी मागणी कोतवाल संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.

संख येथील कोतवाल यांच्यासोबत वाळूतस्करीतील वाहनाच्या सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त मागणीचे निवेदन देण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.