जतेत शिवनेरी मिल्क अँण्ड प्रॉडक्ट प्रकल्पाचा रविवारी शुभारंभ

0
177

कार्यकारी संचालक अभय जमदाडे यांची माहीती

‘सोनाई ‘ सोबत काम करण्याची शेतकऱ्यांना संधी

जत : जत तालुक्यात शेती, सहकार आणि कंन्स्ट्रक्शनशी निगडीत काम करणारा सुप्रसिध्द शिवनेरी उदयोग समुह रविवार दि. २० मार्च रोजी आणखीन एक नवा उद्योग प्रकल्प घेवून जतकरांच्या सेवेत येत आहे. शिवनेरी मिल्क अँड. मिल्क प्रॉडक्ट या प्रकल्पाचा शुभारंभ येथील एमआयडीत होत असून, दुग्ध व्यवसायात देशभरात नामांकीत असणाऱ्या ‘सोनाई’ दुध संस्थेसोबत तालुक्यातील शेतकऱ्यांना काम करण्याची संधी मिळणार आहे. या प्रकल्पाच्या उद्घाटन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे कार्यकारी संचालक अभय जमदाडे यांनी पत्रकार बैठकीत दिली.



अभय जमदाडे म्हणाले, शिवनेरी उद्योग सुमहाचे संस्थापक तथा जिल्हा बँकेचे संचालक, शेतकरी नेते प्रकाशराव जमदाडे यांच्या मार्गदर्शनाखाली जत तालुक्यात गेल्या पंचवीस वर्षांपासून आम्ही विविध क्षेत्रात कार्यरत आहोत. शिवनेरी कंन्स्ट्रक्शन, हॉटमिक्स प्लँट, स्टोन क्रेशर, क्रश सँड, किसान सेवा केंद्र, अत्याधुनिक अॅक्वा  मिनरल वॉटर, शिवनेरी कापड उद्योग, शिवनेरी ट्रेडर्स या व्यवसायाच्या माध्यमातन जत तालुक्यात अनेकांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध करून दिला आहे. शिवाय या व्यवसायाच्या माध्यमांतून जतकरांची विश्वासपूर्ण सेवा करण्याचे काम अविरतपणे सुरू आहे.
जतच्या उद्योग क्षेत्रात शिवनेरी उदयोग समुह विश्वासर्हता, गुणवत्ता आणि जबाबदारी या त्रिसुत्रीवर काम करतो आहे. त्यामुळे कुठल्याही उद्योगात शिवनेरीने आजवर जत मधील जनतेच्या मनात आपले अढळ असे स्थान निर्माण केले आहे.



दुग्ध व्यवसायात प्रदार्पन

शिवनेरीचे प्रमुख प्रकाशराव जमदाडे यांच्या संकल्पनेतून आम्ही येत्या रविवारी शिवनेरी मिल्क अॅण्ड मिल्क प्रॉडक्ट या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा आर्थिक कणा असणाऱ्या व्यवसायाशी जोडलो जात आहोत. देशातील नामांकीत अशा सोनाई दुध संस्थेसोबत काम करण्याची संधी यानिमित्तांनी मिळत आहे. जत तालुक्यात मोठ्या प्रमाणात दुधाचे उत्पादन घेतले जात आहे. दुध व्यवसायात स्पर्धाही मोठ्या प्रमाणात आहे. असे असले तरी शेतकऱ्यांना उत्तम मोबदला करेक्ट फॅट आणि योग्य मोजमाप येथे देण्यात येणार आहे.
शिवाय दुग्ध प्रक्रीया उद्योगातूनही आमच्या सोबत काम करणाऱ्या दुध संस्था, शेतकरी, छोटी छोटी संकलन केंद्रे यांची आर्थिक उन्नती साधण्याचा मानस या संस्थेच्या माध्यमातून करण्यात आला आहे.


दरम्यान, रविवारी जत येथील एमआयडीत सांयकाळी सहा वाजता शुभारंभ होणाऱ्या या प्रकल्पाचे उद्घाटन सोनाई दुध संस्थेचे चेअरमन दशरथ दादा माने यांच्या अध्यक्षतेखाली तर ईश्वर धोंडीबा तांबे व ओम बंडगर महाराज यांच्या शुभहस्ते होत आहे. यावेळी, सोनाईचे संचालक विष्णुकुमार माने, जनरल मॅनेजर संदीप चौंडे, भाग्यलक्ष्मी उद्योग समुहाचे प्रमुख जालिंदर बाबर, विजय आगलावे, संकलन अधिकारी मनोज ढोबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे.


तरी या प्रकल्प शुभारंभास जत तालुक्यातील शेतकरी, दुध उत्पादक संस्था, संकलन केंद्र, प्रमख मान्यवर यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन शिवनेरी उद्योग सुमुहाचे कुटुंबप्रमुख प्रकाशराव जमदाडे, दऱ्याप्पा जमदाडे, अभय जमदाडे यांनी केले आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here