जत महसूलचा कारभार सुधारा, अन्यथा राष्ट्रवादीचा हिसका दाखवू

0
226

जत : जत तहसिल कार्यालय व संख अप्पर तहसिल कार्यालयात कामे व लुबाडणूक होत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. महसूल विभागाने कामात सुधारणा न केल्यास राष्ट्रवादी हिसका दाखवेल ते अधिकाऱ्यांना परवडणार नसल्याचा इशारा राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सुनील पवार यांनी दिला आहे.

पवार यांनी प्रांताधिकारी अजितकुमार नष्टे यांची भेट घेतली व दोन्ही कार्यालयाचा पाढाच वाचून दाखवला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले, हत व संख येथील कार्यालयात मनमानी कारभार सुरू आहे. प्रतिज्ञापत्रासाठी १०० रुपये घेतले जातात, अन्य कामे करतानाही हजारो रुपयांची मागणी केली जाते. दलालांच्या घेऱ्यात ही दोन्ही कार्यालये अडकली असून सर्वसामान्यांची लूट सुरू आहे.

जतचे तहसीलदार व संखच्या अप्पर तहसिलदार यांना आपण वारंवार सूचना, विनंती करूनही कामात सुधारणा झालेली नसल्याने प्रांताधिकारी यांची भेट घेत त्यांना तक्रारी सांगितल्या आहेत. महसूलच्या कारभाराविरुद्ध आ. गोपीचंद पडळकर, जिल्हाधिकारी यांचीही भेट घेणार असल्याचे पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

जत मंडल कार्यालयात दोन दोन महिने नोंदी रखडल्या

जत तहसील कार्यालय हद्दीतील जत मंडल विभाग सर्वाधिक चर्चेत असणारा विभाग आहे.येथे प्रत्येक कामासाठी वजन ठेवावे लागते नाहीतरी चार-चार महिने हेलपाटे घालावे लागतात असे थेट आरोप नागरिक करत आहेत.विशेष म्हणजे येथे नोंदीसाठी किमान दोन-दोन महिन्याचा कालावधी लागत आहे.जत तलाठी ऑफिस व मंडल विभागाचा पंचनामा प्रांताधिकारी व तहसीलदार यांनी करावा,अशी मागणी शेतकऱ्यांसह नागरिकातून होत आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here