मोरबगी येथे ट्रक-टेम्पोच्या अपघातात एकाचा मृत्यू

0
207

मृत सोलापूर जिल्ह्यातील; वाहनांची समोरासमोर धडक

संख : अहिल्यानगर-विजापूर महामार्गावर मोरबगी (ता.जत) येथील लवंगाजवळ ट्रक व टेम्पोची समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात ट्रकचालक पवन रामचंद बुद्रुक (वय २२ रा. वळूज ता. मोहोळ, जि. सोलापूर) यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दि.२३ रोजी स्वामी मळ्यात दुपारी अडीच वाजता घडली.

जत पूर्व भागात अहमदनगर-विजापूर महामार्गावर मोरबगी गावापासून अर्धा किलोमीटर अंतरावर ट्रक (क्रमांक एमएच १८, इए ९५८५) हा द्राक्षाचे क्रेट घेऊन विजापूरकडे निघाला होता. मालवाहू टेम्पो (क्रमांक सीएनं ५९, बीडब्लू ८३४४) हा विजापूरहून पंढरपूरकडे निघाला होता. ट्रक व टेम्पो मोरबगीजवळील स्वामी मळ्याजवळ मोरबगी (ता. जत) येथील अपघातात ट्रकच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला.

धडक इतकी जोराची होती की त्यामध्ये ट्रकचा पुढील भागाचा चेंदामेंदा झाला. गाडीच्या केबीनमध्ये चालक अडकून पडला. त्यांच्या डोक्याला जोराचा मार लागल्याने जागेवरच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच उमदी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह जत ग्रामीण रुग्णालयाला पाठविला. अधिक तपास उमदी पोलिस करीत आहेत.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here