डफळापूर बुवानंद देवाचा ऊरूस १४ मे पासून भरणार

0
123

डफळापूर : येथील श्री बुवानंद देवाचा उरुस सालाबादप्रमाणे या वर्षीही बुधवार दि.१४ मे ते शुक्रवार दि.१६ मे अखेर संपन्न होत आहे.उरुसानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत.

ऐतिहासिक महत्व असलेल्या डफळापूरचे ग्रामदैवत ग्रामदैवत श्री.बुवानंद व डोंगरावरील बावानंद देवाचा मोठा महिमा आहे.बुवानंदाची पांढरी म्हणूनही डफळापूरचा उल्लेख होतो.संस्थान काळापासून येथे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक म्हणून येथील नागरिक ऊरूस मोठ्या उत्साहात साजरा करतात.

बुधवार दि. १४ मे रोजी गंधरात्र व रात्री लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर निर्मित ‘नटरंगी नार’ बहारदार लावण्याचा ठसकेबाज कार्यक्रम रात्री ठिक ८ वाजता होणार आहे.

गुरुवार दि.१५ मे रोजी मुख्य दिवस,सिनेस्टार रेखा पाटील सह मेघा कोल्हापुरकर यांचा लोकनाट्य तमाशा रात्री ठेवण्यात आला आहे.

गुरूवार दि.१५ मे रोजी सकाळी ९ वाजता सायकल शर्यती (बक्षिसे प्रथम ५००१,व्दितीय ३००१ तृतीय क्रमांक: २००१),धावणे शर्यती(प्रथम ३००१,व्दितीय २००१,तृतीय १००१)महाप्रसाद : दुपारी १ वाजता,निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान दुपारी ४ वाजता

धनगरी ओव्या,प्रथम ५००१,व्दितीय ३००१,तृतीय २००१)कै.सुनिल (बापू) चव्हाण यांचे स्मरणार्थ माजी पंचायत समिती दिग्विजय चव्हाण,मार्केट कमिटी माजी चेअरमन अभिजीत चव्हाण यांचे वतीने आयोजित केले आहे.कुस्ती मैदानाचे उद्‌घाटक आमदार गोपीचंद पडळकर यावेळी डिवायएसपी पै.सुनिल सांळुखे उपस्थित राहणार आहेत.या ऊसासाचा भाविकांनी लाभ घ्यावा,असे आवाहन ऊरूस कमिटीकडून करण्यात आले आहे.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here