गुरुपौर्णिमे दिवशी वरूण राजाला साकडे 

0
4

हभप तुकाराम बाबा यांनी केली प्रार्थना 

जत : जत पूर्व भाग तसेच मंगळवेढा सांगोला परिसरात शेतकऱ्यांच्या वरती दुबार पेरणीचे संकट आले असून गुरुपौर्णिमेनिमित्त श्रीक्षेत्र भुयार मठ येथे हभप तुकाराम बाबा यांनी आज वरून राजाला साकडे घातले व प्रार्थना केली. 

मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा तसेच भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांच्या उपस्थितीत श्रीक्षेत्र भुयार मठ या ठिकाणी गुरुपौर्णिमेनिमित्त विविध उपक्रम आयोजित करण्यात आले होते गुरुपूजा गोपाळकाला महाप्रसाद व दिल्ली असे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सेवावृत्त पोलीस उपअधीक्षक शशिकांत दसुरकर,एडवोकेट जमखंडी,कोरे महाराज, सोलापूर, रेवणसिद्ध व्हनमराठे, सोलापूर, जेष्ठ पत्रकार दिनराज वाघमारे उपस्थित होते.गुरु पौर्णिमेनिमित्त भाविक भक्तांनी श्री संत बागडे बाबा यांच्या समाधीचे दर्शन घेतले तसेच आपले गुरु हभप तुकाराम बाबा महाराज यांचे दर्शन घेऊन गुरुदक्षिणा दिली.   

यावेळी प्रदक्षिणा दिंडी फुगड्यांचे कार्यक्रम अत्यंत उत्साहात संपन्न झाले. हभप तुकाराम बाबा महाराज यांनी श्री संत बागडे बाबा तसेच श्री विठ्ठलाला प्रार्थना केले व वरूण राजांना साकडे घातले. परिसरातील बहुसंख्य शेतकऱ्यावर पाऊस नसल्याने दुबार पेरणीचे संकट आले आहे नजीरच्या काळात पाऊस झाला नाही तर या परिसरात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळे चांगला पाऊस व्हावा यासाठी पांडुरंगाकडे प्रार्थना केली. 

गोपाळकाला व दहीहंडीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता अबब तुकाराम बाबा महाराज यांच्या हस्ते दहीहंडी फोडल्यानंतर गोपाळकाला करण्यात आला सर्व भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here