संख मध्यम प्रकल्पाच्या कँनॉलमधून पाण्यासाठी उपोषणाचा इशारा

0



बालगांव,संकेत टाइम्स : जत तालुक्यातील संख मध्यम प्रकल्पामध्ये 15 वर्षांनी संपूर्ण तलाव काटोकाट भरले आहे, ते पाणी डावा कालवा मधून सोडले तर शेतीचे पाणी व पिण्याच्या पाण्याची समस्या सध्या उन्हाळ्यात करजगी,बेळोडगी,हळ्ळी, बालगाव व उमदी या सर्व लहान मोठ्या गावांचे समस्या शंभर टक्के निवारण होणार आहे यात कोणतीच अडथळा नाही.






मात्र हा डावा कालवा 11 किलोमीटर पर्यंत पाठ बंधारा विभागाकडे हस्तांतरित झालेले आहे, तरी पुढचे कालवा आमच्याकडे हस्तांतरित झालेले नाही पाणी सोडण्यास आम्ही असमर्थ आहोत असे कित्येक वेळा मागणी करून ही पाटबंधारे विभाग संख यांच्याकडून उत्तर येत आहे,तरी जत तालुका हा दुष्काळी भाग आहे या भागातील 42 गावांना ना म्हैसाळचा व ना तुबची बबलेश्वरची पाणी  मिळणार नाही. 






आपल्या तालुक्यामध्ये आपले महाराष्ट्र शासन बांधून ठेवलेले तलाव पूर्णपणे भरलेले आहेत हा आमच्या हक्काचा पाणी आपल्या शेतकऱ्यांना देऊन या भागातील दुष्काळ हटवावे,अशी मागणी हळ्ळीचे उपसरपंच लोकप्पा उर्फ बाबुराव अण्णाप्पा नागोंड यांनी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्रीव पालकमंत्री जयंतराव पाटील  तसेच पोलीस अधीक्षक सांगली,पाटबंधारे विभाग शाखा जत व संख,जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार विक्रमसिंह सावंत व जत तालुक्याचे तहसीलदार सचिन पाटील व उमदी पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय कोळेकर व मृदा व जल संधारण विभाग जत यांच्याकडे निवेदनाद्वारे पत्रव्यवहार केलेला आहे.


Rate Card





त्यातील महत्वाच्या मागणी  बालगाव येथे माळी वस्ती जवळ चेकडाम मृदा व जलसंधारण विभागाकडून मंजूर होऊन दोन वर्षे झाले तरी अद्याप हे काम चालू झाले नाही, चेकडाम चे काम चालू करावे, त्याचबरोबर संख मध्यम प्रकल्पातील डावा कालवा अकरा किलोमीटर पुढचा कालवा हस्तांतर होऊन कालवा मधून काटेरी झाडेझुडपे काढून बालगाव व उमदी या गावचे शेतकरी बांधवांना पाणी सोडावे हे काम 14 एप्रिल पर्यंत सुरू नाही केले




 तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिवशी गाव कामगार तलाठी कार्यालया हळ्ळी समोर प्राणांतिक आमरण उपोषण करनार आहोत.जर आपल्या जिवास काही धोका झाल्यास शासन जबाबदार राहील,असेही त्यांनी पत्रकात नमूद केलेले आहेत.



Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.