संख प्राथमिक आरोग्य केंद्राची 108 रुग्णवाहिका डॉक्टरांविना बंद
जत,संकेत टाइम्स : 108 रुग्णवाहिका ही गोरगरीब नागरिकांसाठी रक्तवाहिनी ठरत असताना संख प्राथमिक आरोग्य केंद्रात मात्र 108 रुग्णवाहिकेला डॉक्टर नसल्याने गरिबांचे हाल होत आहेत.अतिगंभीर रुग्णांना वेळेवर उपचार मिळवून देऊन प्राण वाचवणारी 108 नंबरची रुग्णवाहिकाच
व्हेंटिलेटरवर असल्याचे चित्र जत तालुक्यातील संख प्राथमिक आरोग्य केंद्राचे झाले आहे.
रुग्णवाहिकेच्या गैरसोयीमुळे अनेक रुग्णांना मृत्यूला सामोरे जावे लागले आहे. तालुक्यातील दोन 108 रुग्णवाहिकेवर डॉक्टर नसल्यामुळे सेवा काही महिन्यांपासून ठप्प आहे.108 रुग्णवाहिका सेवा महिन्यापासून बंद अवस्थेत आहे.रुग्णवाहिकांवर चालक असून केवळ डॉक्टर नसल्याने ही सेवा ठप्प आहे. याचा प्रत्यय संख येथील रुग्णालयात आला आहे.

काहीवेळा रुग्णांना वेळेत 108 रुग्णवाहिका सेवा न मिळाल्याने उशिरा पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र काही रुग्णांचा वेळेत उपचार न मिळाल्याने मुत्यू झाला आहे.या रुग्णवाहिकेला डॉक्टर नसल्याने चालक रुग्णवाहिकांसाठी आलेला कॉल उचलत नाहीत,कोरोनाच्या काळात अशी स्थिती या रुग्णवाहिकेची स्थिती बनली आहे.संख परिसरातील सुमारे 20 गावांची अपत्कालीन सेवा देणार रुग्ण वाहिका कायम सज्ज असणे गरजेचे आहे.मात्र संबधित यंत्रणांचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
