शासनाच्या निर्बंधानंतरही शेगांवमध्ये आठवडा बाजार भरला

0शेगांव, संकेत टाइम्स : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी रवीवारीच राज्यात‌ कडक निर्बंध घातले आहे.राज्यभरात जमावबंदी घोषित करण्यात आली आहे. इतके‌ असताना गावात कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत,तरीही शेगाव ता.जत येथील सोमवारचा आठवडा बाजार भरल्याने धोका बळावला आहे.राज्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत.त्यातच जिल्ह्यातील रुग्ण संख्या चिंता वाढवत आहेत.त्यामुळे पुढील काही आठवडे आठवडा बाजार बंद करण्यात आले आहेत. मात्र शेगावमध्ये या आदेशाला हारताळ फासत गावातील प्रमुख चौकात बाजार भरविण्यात आला होता.

Rate Cardएकीकडे शेगावमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असतानाही ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. खरेतर बाजार मांडलेल्या व्यापाऱ्यांना हटविण्याची कारवाई ग्रामपंचायती कडून होण्याची गरज होती.मात्र त्यांच्याकडून कारवाई झाली नसल्याने पुर्ण क्षमतेने बाजार भरला होता.मोठ्या संख्येने व्यापारी,नागरिकांची गर्दी होती.


सोशल डिस्टसिंग,मास्कही वापरला नव्हता.अशा प्रकाराने कोरोनाच्या संर्सगाला आमंत्रण देण्यात येत आहे.कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत  रूग्ण वाढल्यावर सावध होण्यापेक्षा अगोदरच कारवाई करण्याची गरज आहे. अशा प्रकाराने कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता आहे.शेगाव ता.जत येथे आठवडा बाजार भरविण्यात आला होता.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.