…अखेर कोकळे-जत महामार्गाचे डांबरीकरण पुर्ण

0जत,संकेत टाइम्स : जत-सांगली 

रस्त्याला जोडणारा महत्वाचा असणाऱ्या जत-डफळापूर महामार्गाचे‌ काम अखेर पुर्ण करण्यात आले आहे.उर्वरित काही टप्यातील कामाची टेंडर प्रक्रिया दुसऱ्या टप्यात झाली आहे.तेही काम लवकरचं पुर्ण करण्यात येणार आहे.प्रांरभी रस्त्याच्या दुरावस्थेबद्दल अनेक‌वेळा टिका झाली होती.हा प्रमुख राज्यमार्ग असल्याने रस्ते प्राधिकरण विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे कोल्हापूर येथील कार्यालयाकडून रस्त्याचे काम करण्यात आले आहे.सांगलीच्या बाबासाहेब गुंजाटे यांच्या बी.बी.कंस्ट्रक्शन कंपनीकडून बँचमिक्स प्लँट या अत्याधुनिक व नव्या नियमानुसार दर्जेदार काम करण्यात आले आहे.रस्त्यावर डांबरीकरणाचे डी.बी.एम.व डीसी असे दोन वेगवेगळे थर मारण्यात आले आहेत.उच्च दर्जाचे डांबर व प्रमाण जास्त‌ वापरण्यात आले आहे.नेमके वातावरणातील उन्हाचा तडाका यामुळे डांबर,खडीचे मिश्रण योग्य पध्दतीने बसल्याने रस्ता मजबूत झाला आहे. 

भविष्यात‌ चार-पाच वर्षे रस्ता मजबूत राहिल असे काम बाबासाहेब गुंजाटे कंस्ट्रक्शन कंपनीकडून करण्यात आले आहे. उर्वरित कोकळे ते कुडणूर फाट्या,वन विभागाची रोपवाटिका ते,खलाटी स्टँड पुढील वळण,वाषाण फाटा ते रामपूर(माळी वस्ती)असे तीन टप्यातील पाच-सात किलोमीटरचे काम टेंडर प्रक्रियेत असल्याने येत्या काही दिवसात करण्यात येणार आहे. 

Rate Card


या रस्त्याच्या कामामुळे आता जत पासून डफळापूर, कवटेमहांकाळ, मिरज,सांगली अशी वाहतूक वाढणार आहे.रस्ता मजबूत झाल्याने वाहनाचे डिजेल,पेट्रोलची बचत होणार आहे.वाहनाच्या मोडतोडीचे प्रकारही थांबणार आहे.दरम्यान वाहन धारकातून समाधान व्यक्त होत आहे.

जत-डफळापूर या मार्गाचे‌ अत्याधुनिक पध्दतीने डांबरीकरणाचे काम करण्यात आले आहे.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.