आमदार सांवत यांच्याकडून जळीतग्रस्त कुंटुबियांना मदत

0कोतेबोबलाद : कोतेबोबलाद ता.जत येथील दत्ता परिट यांचे घर व हॉटेलला अचानक आग लागून सुमारे पाच लाखाचे नुकसान झाले आहे.घटनेची माहिती मिळताच जतचे आमदार विक्रमसिंह सांवत यांनी तात्काळ कोतेबोबलाद गाठत परीट कुंटुबियांना भेट देत धीर दिला.त्याचबरोबर संसार उपयोगी साहित्याची मदत दिली.शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठीही पाठपुरावा असे आश्वासन दिले.


यावेळी शंकर सांवत, कुंडलिक कांबळे,ग्रा.प.सदस्य रमेश माळी,मुरलीधर जगताप,श्रीहरी पाटील,महादेव बिराजदार,बाळू पवार,शामू नरळे उपस्थित होते. दरम्यान उन्हाचा तडाका वाढल्याने आगीच्या घटना वाढत आहेत.तालुक्यातील नागरिकांनी गँस,चुली वापरताना काळजी घ्यावी,गँस सुरू असताना अन्य काही कामे करू न‌येत,पुर्णत: गँस बंद झाल्याची खात्री करावी,कामे आटपल्या नंतर चुलीतील विस्तव पुर्ण विजवला जावा,अशा खबरदारी,खास करून महिलांनी घ्याव्यात,आगीच्या घटना कुणालाही परवडणाऱ्या नाहीत,त्यामुळे काळजी घ्यावी,असे आवाहन आ.विक्रमसिंह सांवत यांनी केले आहे.

Rate Card

कोंतेबोबलाद ता.जत येथे जळितग्रस्त दत्ता परीट कुंटुबियांना संसार उपयोगी साहित्याची मदत करताना आ.विक्रमसिंह सांवत

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.