कुणीकोणूरमध्ये डेंग्यूची साथ,ग्रामस्थ आक्रमक

0जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यातील 

कुणीकोनूर येथे 15 जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. तर 50 हुन अधिक रुग्णांना त्रास होत आहे. गावात डेंग्यूची साथ आलेली असताना ग्रामपंचायत व आरोग्य विभाग दुर्लक्ष करत असल्याने अखेर कुणीकाणूर ग्रामस्थांनी शनिवारी ग्रामपंचायती समोरच ठिय्या मारत बेमुदत उपोषण सुरु केले. ज्ञानेश्वर आटपाडकर, रमेश निदर्शनास चव्हाण, नवनाथ म्हस्के, रामचंद्र खांडेकर, रखमाजी खरात, परसराम राठोड आदी लोकांनी  ग्रामपंचायती समोर उपोषण सुरू केले.Rate Card
दरम्यान येळवी प्राथमिक आरोग्य केंद्राला यानंतर जाग आली त्याचे कर्मचारी तात्काळ कुणीकोणूरमध्ये पोहचत घर टू घर तपासणी सुरू केली आहे.त्याचबरोबर ग्रामपंचायतीने औषध फवारणी चालू केली असून,ग्रामस्थांना औषधाचेही वाटप सुरू केले आहे.मात्र जबाबदारी झटकल्याने डेंग्यूचा प्रभाव वाढला आहे.संबधित बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी,अशी मागणीही ग्रामस्थानी केली आहे.shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.