बोर्गी उपकेंद्रात कोरोना लसीकरणास सुरुवात
भिवर्गी,संकेत टाइम्स : बोर्गी (ता.जत) येतील उपकेंद्रात 45 वर्षावरील नागरिकांना लसीकरण सुरू करण्यात आले आहे.प्रथम उपकेंद्रात लसीकरणाचा प्रांरभ भिवर्गीचे सरपंच मदगोंड सुसलाद व बोर्गी खुर्द सरपंच राजेंद्र बिराजदार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.
यावेळी को.बोबलाद डॉ.दयानंद वाघोली,बोर्गी उपसरपंच राघवेंद्र होनमोरे,समुदाय आरोग्य अधिकारी हणमंत मेडेदर,भिवर्गीचे पोलिस पाटील श्रीशैल चौगुले, माजी उपसरपंच कल्लप्पा बिराजदार,कुमार पाटील, हणमंत पाटील,ग्रामसेवक यल्लाप्पा पुजारी,आशा वर्कर आधी लोक उपस्थित होते.

यावेळी प्रथम लस भिवर्गीचे सरपंचमदगोंड सुसलाद यांना टोचण्यात आली.सरपंच सुसलाद म्हणाले की, लसीकरण एकदम सुरक्षित आहे, सर्वांनी लसीकरण करून घ्यावे असे त्यांनी सांगितले.
बोर्गी उपकेंद्रात कोरोना लसीकरणास सुरुवात करण्यात आली.