उत्तर भाग आता पुर्ण ओलिताखाली ; आ.विक्रमसिंह सांवत | तालुक्यातील अखेरच्या गावापर्यत पाणी पोहचविणार

0जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यातील उत्तर भाग आता पुर्णत:ओलिताखाली आला असून तालुक्यातील पुर्व भागातील पाणी प्रश्न सोडवून जत तालुका पाणीमय करू,असे प्रतिपादन आ.विक्रमसिंह सांवत यांनी केली.

जत उत्तर भागातील म्हैसाळ योजनेच्या अंतराळ,सिंगनहळ्ळी बंदिस्त जल वित्रिका पाईप लाईनमधून आ.सांवत यांच्याहस्ते पाणी सोडण्यात आले.यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अप्पाराया बिराजदार,माजी पं.स.सभापती बाबासाहेब कोडग,पं.स.सदस्य दिग्विजय चव्हाण,रविंद्र सावंत,नगरसेवक भुपेंद्र कांबळे,सहायक कार्यकारी अभियंता अमोल चोपडे,उपअभियंता अभिमन्यू मासाळ, इंजिनिअरिंग श्री.दळवी,जि.के.पूर्वहीत,वाहनचालक मिरजकर,व ग्रामस्थ उपस्थित होते.


आ.सांवत पुढे म्हणाले,जत तालुका सिंचन योजनेतून ओलिताखाली आणण्याचे माझे स्वप्न आहे.त्यानुसार म्हैसाळ योजनेच्या बंदिस्त पाईपलाईनच्या माध्यमातून जत पश्चिम, उत्तर,दक्षिण भागात मोठ्या प्रमाणातील क्षेत्र ओलिताखाली आला आहे.
Rate Card
त्या भागात म्हैसाळ योजनेतून पाणी सोडण्यात येत आहे.या आवर्तनातही पुर्ण क्षमतेने पाणी सोडून सर्व तलाव,नालाबांध,ओढा पात्रातील बंधारे भरून घेण्यात येणार आहेत.उत्तर भागातील सिंचनापासून वंचित अंतराळ,आंवढी,सिंगनहळ्ळी,लोहगाव,वायफळ या गावातील पाणी प्रश्न सुटणार आहे. 


या बंधिस्त पाईपलाईनच्या माध्यमातून उमदीपर्यत लवकरचं पाणी सोडण्यात येणार आहे. त्यासाठीच्या पाईपलाईनचे काम गतीने सुरू आहे.जत उत्तर भागातील अंतराळ,सिंगनहळ्ळी बंदिस्त पाईपलाईनमधून म्हैसाळ योजनेचे पाणी सोडण्यात आले.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.