जत नगरपरिषद काँग्रेस कार्यक्षेत्र अध्यक्षपदी भूपेंद्र कांबळे यांची निवड

0
जत,संकेत टाइम्स : काँग्रेस पक्षात प्रवेश केलेले जत नगरपरिषदेचे माजी बांधकाम सभापती तथा दलित पँथरचे जिल्हा उपाध्यक्ष भूपेंद्र कांबळे यांची जत नगरपरिषद काँग्रेस कार्यक्षेत्र अध्यक्षपदी निवड झाली आहे.निवडीचे पत्र काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष आमदार मोहनशेठ कदम यांनी दिले आहे.यावेळी जत तालुका काँग्रेसचे अध्यक्ष आप्पाराया बिराजदार, माजी सभापती बाबासाहेब कोडग,कुणाल शिंदे,उपस्थित होते.यावेळी आमदार मोहनशेठ कदम म्हणाले की,काँग्रेस पक्ष हा समाजातील सर्व

घटकांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष आहे.नगरसेवक भूपेंद्र कांबळे यांचे कार्य कौतुकास्पद आहे.त्यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी सोपवली आहे.शहरात काँग्रेस बळकट करण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत असे शेवटी आवाहन त्यांनी केले.


यावेळी नगरसेवक भूपेंद्र कांबळे म्हणाले की, राज्याचे सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ.विश्वजित कदम,काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार मोहनशेठ कदम व आमचे नेते आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या नेतृत्वाखाली जत शहरात काँग्रेस बळकट करणार आहे.तसेच सर्व समाजातील घटकांना बरोबर घेऊन काम करणार आहे.Rate Card

प्रत्येक प्रभागात वन बुथ,टेन युथ ही संकल्पना राबविणार आहे.शासनाच्या विविध योजना गोर-गरीब जनतेपर्यंत पोहोचवणार असून पक्ष वाढीसाठी सर्वांना विश्वासात घेऊन काम करणार असल्याचे कांबळे यांनी सांगितले.
जत नगरपरिषद काँग्रेस कार्यक्षेत्र

अध्यक्षपदी भूपेंद्र कांबळे यांना निवड पत्र देताना आ.मोहनशेठ कदम, बाबासाहेब कोडग,आप्पाराया बिराजदार

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.