अंकलेत विविध विकासकामाचे आ.सांवत यांच्याहस्ते भूमिपुजन
डफळापूर,संकेत टाइम्स : अंकले ता.जत येथील विविध विकास कामाचे भूमीपुजन आमदार विक्रमसिंह सांवत यांच्याहस्ते करण्यात आले.काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अप्पाराया बिराजदार,माजी पं.स.सभापती बाबासाहेब कोडग,जि.प.सदस्य महादेव पाटील,पं. स.सदस्य दिग्विजय चव्हाण,जत मार्केट कमिटी माजी सभापती अभिजित चव्हाण,व गावातील सरपंच,उपसरपंच सदस्य ग्रामस्थ कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी धावडवाडी येथे हिवरे रस्त्यापासून शिरी मळा खडीकरण मुरुमीकरण, हिरवे येथे शाळा खोल्या बांधकाम,डोर्ली येथे ब्राह्मणाथ देवाकडे जाणार रस्ता खाडीकरण मुरुमीकरण,अंकले येथे शाळा खोल्या व के.टी वेअर,बेंळुखी येथे शाळा खोल्या बांधकाम,या सर्व कामांचे भूमिपूजन आमदार सावंत यांनी केले.
आमदार सांवत व जिल्हा परिषद सदस्य महादेव पाटील यांच्या प्रयत्नातून ही विकास कामे मंजूर करण्यात आली आहेत.डफळापूर जिल्हा परिषद मतदार संघातील विकासाचा अनुषेश भरून काढू असे यावेळी आ.सांवत म्हणाले.

अंकले ता.जत येथे विविध विकास कामाचे भूमिपुजन आ.विक्रमसिंह सांवत यांच्याहस्ते करण्यात आले.
