माहिती अधिकार अर्जाला वायफळ ग्रामपंचायतीकडून केराची टोपली | फी भरूनही माहिती देण्यास टाळाटाळ ; मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन

0जत,संकेत टाइम्स : ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविकेकडे गावठाण हद्दीत झालेल्या अतिक्रमणबाबत माहितीचा अधिकार वापरून उत्तम साबळे यांनी माहिती मागितली आहे. परंतु सतत पाठपुरावा करूनही माहिती उपलब्ध न झाल्याने अपिलात जावे लागले. पण तेथे सुध्दा अधिकार्‍यांनी या अर्जाला केराची टोपली दाखविल्याचा संतापजनक अनुभव 

जत तालुक्यातील वायफळ ग्रामपंचायती कडून आला आहे.


यांची खातेनिहान चौकशी करावी या मागणीचे निवेदन साबळे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डूड्डी यांना दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की,

वायफळ ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात गावठाण हद्दीत उत्तम साबळे यांच्या भावकितील काहींनी सुमारे 20 गुंठ्यांत बेकायदेशीर रित्या अतिक्रमण करून  दुकान गाळे आणि कंपाऊंड बांधले आहे.असा संशय साबळे यांना आल्यानंतर यासंदर्भात साबळे यांनी सन 2020 मध्ये माहितीचा अधिकार वापरून वायफळ ग्रामपंचायतकडे माहिती घेतली आहे. 

Rate Card

ग्रामसेवक यांच्या लेखी सांगण्यावरून माहितीसाठी लागणारी फी रक्कम सुद्धा ग्रामपंचायत खात्यावर जमा केले आहे,असे असताना कित्येक महिन्यापासून पाठपुरावा करूनही ग्रामसेविका यांनी माहिती देण्यास टाळाटाळ आणि दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे काही महिन्याची वाट पाहून साबळे यांनी वरिष्ठ कार्यालयाकडे या विरोधात अपील केले आहे.पण तेथे सुध्दा अधिकार्‍यांनी सोयीस्करपणे या अर्जाला केराची टोपली दाखविल्याचा संतापजनक अनुभव साबळे यांना येत आहे. 

वरिष्ठ अधिकारी यांच्या अपिलीय कार्यालयात मुदत संपूनही अपिलीय अधिकारी माहिती देण्यास टाळाटाळ करत असल्याचे लक्षात आले आहे. यामुळे या टाळाटाळमागे ‘पाणी मुरतंय कुठे?…’  हा प्रश्‍न उपस्थित होतो आहे. त्यामुळे अशा अधिकार्‍यांकडून  कायद्याचा भंग होत असल्याचे दिसत आहे,त्यांची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी,अशी मागणी साबळे यांनी निवेदनात केली आहे.shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.