2 वर्षापासून फरार मोकातील 2 आरोपी जेरंबद
सांगली : गेल्या 2 वर्षापासून मोक्या गुन्ह्यातील पाहिजे असलेल्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरंबद केले.वैभव रमेश बाबर वय 55,रा.कर्नाळ प्लॉट,सांगली,रविराज शंकर जाधव वय 25,जूना स्टेशन रोड सांगली असे अटक आरोपीची नावे आहेत.
मोका गुन्हा दाखल असलेले वैभव बाबर,रविराज जाधव यांना सांगली कॉर्नर सांगली येथून पोलीसांनी ताब्यात घेतले.मिरज पोलीस ठाणे हद्दीत या आरोपी विरोधात मोकासह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.पो.नि.सर्जेराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली निरिक्षिक रविराज फडणीस,अभिजीत सांवत,राहुल जाधव,संदिप नलवडे,मुदतसर पाथरवट,प्रंशात माळी,उदय साळुखे,मच्छिद्र बर्डे,राजू मुळे,मारूती सांळुखे यांच्या पथकाने कारवाई केली.
गुन्हेगारा विरूध्द व्यापक मोहिम राबवून गुन्हेगारी समूळ नष्ट करणार असल्याचे पोलीस अधिक्षक दिक्षित गेडाम यांनी सांगितले.

सांगली येथे मोका गुन्ह्यातील पकडलेल्या आरोपीसह पोलीस पथक