जतच्या भारती वस्तीगृहाचा नामकरण सोहळा शनिवार ऐवजी रविवार होणार
जत,प्रतिनिधी : भारती विद्यापीठ जत येथील वस्तीगृहाचा नामकरण सोहळा समारंभ शनिवार दि.9 जानेवारी रोजी सकाळी 10.00 वाजता निश्चित करण्यात आला होता परंतु अपरिहार्य कारणामुळे हा सोहळा रविवार दि.10 जानेवारी रोजी सकाळी 10.00 वाजता या वेळेत राज्याचे कृषी मंत्री व सहकार राज्यमंत्री डॉ.विश्वजित कदम,भारती विद्यापीठ शालेय शिक्षण समिती अध्यक्षा विजयमाला कदम व आमदार विक्रमसिंह सावंत तसेच श्रीमंत सुनित्राराजे दरेकर,श्रीमंत इंद्रजीतराजे डफळे,श्रीमंत शार्दुलराजे डफळे,श्रीमंत मंगलाराजे देशमुख यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे
कार्यक्रमातील या बदलाची नोंद जत तालुक्यातील जननेते घ्यावे असे आवाहन विभागीय संचालक डॉ.एच.एम.कदम यांनी केली आहे.