जतेत शनिवारी भव्य मोफत आरोग्य शिबीर
जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील भाजपचे जेष्ठ नेते डॉ.रविंद्र आरळी यांच्या वाढदिवसा निमित्त सिनर्जी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या तर्फे शनिवार ता.9 जानेवारी रोजी भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा तालुक्यातील रुग्णांनी लाभ घ्यावा असे,आवाहन रोहित आरळी यांनी केले आहे.
मिरज येथे अल्पावधित प्रसिद्ध झालेल्या सिनर्जी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलच्या तज्ञ डॉक्टरांची टिम या शिबिरासाठी उपस्थित राहणार आहेत.यावेळी ह्रदय रोगांची तपासणी व निदान,मणक्याच्या आजाराची तपासणी व निदान,गुडघ्यांच्या शस्ञक्रिया,अपघाती फ्रँक्चर,त्यावरील शस्ञक्रिया,स्ञियांचे आजार व शस्ञक्रिया, गर्भाशयाचे आजार,शस्ञक्रिया,लेजरद्वारे मुतखड्याच्या शस्ञक्रिया, लघवीचे विकार व शस्ञक्रिया, डायलिसीस,डोळ्याचा तिरळेपणा,

बिनटाक्याची मोतीबिंदु
आजार,मुळव्याध,भगंदर शस्ञक्रिया, स्तनांचा कर्करोग शस्ञक्रिया, सर्व प्रकारच्या जनरल शस्ञक्रिया येथे उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
उमा हॉस्पिटल,आंबेडकर नगर जत येथे शनिवारी 9 जानेवारी सकाळी 10 ते 5 पर्यत हे शिबिर आयोजित केले आहे. सह कुटुंब या शिबिराचा लाभ घ्यावा,असे आवाहन रोहित यांनी केले आहे.