तलाठ्याकडून शेतकऱ्यांची लूट
कोन वाली आहे का,नाही ; सटेलमेंटच्या टोळ्या,कसेही लुटा !
जत,प्रतिनिधी : सोसायटी, अन्य बँकचा बोजा,इकरार नोंदविणे,सातबारे दुरूस्ती,नोंदीसाठी तालुक्यातील शेतकऱ्यांची तलाठ्यांकडून शेतकऱ्यांची आर्थिक मुस्कटदाबी करत लुट केली जात असल्याचे वास्तव पुन्हा समोर आले आहे. जत तालुक्यातील दरिबडची सज्जावर शेतकऱ्यांचा इकरार नोंदविण्यासाठी पाचशे रूपये लाच घेताना पकडलेल्या दरिबडची गावाचा तलाठी विलास भरमन्ना चव्हाण लाचलुचपतच्या जाळ्यात सापडल्याने संख अप्पर तहसील कार्यालयात हद्दीतील शेतकऱ्यांची लुट समोर आली आहे.
शेतकऱ्यांच्या अडचणीचा फायदा तलाठी उचलत असल्याचे समोर आले आहे.संख अप्पर तहसील कार्यालय हे शेतकऱ्यांच्या लुटीचा अड्डा बनला आहे.गतवेळेचे अधिकाऱ्यांनी ठेवलेला कडक शिस्तीचा पांयडा नव्याने आलेल्या अधिकाऱ्यांनी धुळीस मिळविला आहे.या
कार्यालयाच्या हद्दीतील मंडल अधिकारी,तलाठी शेतकऱ्यांचे लुटेरे बनले आहेत.मोफत देण्याचे बंधनकारक असलेल्या कागदपत्रासाठी पाचशे ते दहा हजारापर्यत पैशाची मागणी केली जात आहे.पैसे न देणाऱ्या नागरिकांची कामे अडविली जात आहेत.
नोंदीसाठी आकडे ठरले
जत तालुक्यात सध्या जमिन,प्लॉट खरेदीचा हंगाम सुरू आहे.त्यांचा फायदा थेट महसूलमधील अधिकारी,कर्मचारी,मंडल अधिकारी,तलाठ्यांनी घेतला आहे.जमिनीच्या खरेदीपासून नोंदीपर्यत लाल नोटाचे दर्शन झाल्याशिवाय कागद पुढे सरकत नाहीत.सर्व प्रक्रियेतील व्यक्तीचे द्यावयाचे पैशाचे आकडे ठरले आहेत.दुसरीकडे प्लॉट विक्रीचा धंदा चांगलाच जोमात आला आहे. गुंठेवारी प्लॉट एन ए असल्याचे फलके झळकावत लोंकाना थेट लुटले जात आहे. एन.ए.साठी संबधित विभागातील अधिकारी,कर्मचाऱ्याचे हात यात बरबटले आहेत.असे गुंठेवारी प्लॉट एन.ए.आहेत म्हणून परवानगीसाठी काही कर्मचाऱ्यांना प्लॉट गिप्ट देण्यापर्यत मजल गेल्याची चर्चा आहे.
नोंदीसाठी 10 हजार ते लाखापर्यत आकडा
जत शहरासह तालुक्यातील मंडल अधिकारी,तलाठ्याकडून जमिन,प्लॉट नोंदीसाठी दहा ते लाखापर्यत लाच घेतली जात असल्याचे आरोप आहेत. पैसे न देणाऱ्याच्या नोंदी वर्षान् वर्ष रखडल्या आहेत.शहरात हा प्रकार राजरोसपणे सुरु आहे.
भष्ट्र कर्मचाऱ्याची चौकशी गुंडाळली
जत तालुक्यातील काही भ्रष्ट मंडल अधिकारी, तलाठ्याची समिती नेमून चौकशी करण्यात आली आहे.चौकशीचे अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे दाखल झाले आहेत.मात्र भ्रष्ट कारभाराचे आरोप होऊनही रखडलेली चौकशीची कारवाई अनेक प्रश्न उपस्थित करत आहे.
संख अप्पर तहसील कार्यालय लुटीचा अड्डा
संख अप्पर तहसीलदार कार्यालय शेतकऱ्यांच्या लुटीचा अड्डा बनल्याचे समोर आले आहे.मोफत दिला जाणाऱ्या इकरार नोंदविण्यासाठी पाचशे रूपये लाच घेण्याचा दुर्देवी प्रकार समोर आला आहे.या भागासह तालुक्यातील सर्वच तलाठी इकरार नोंदविण्यासाठी पैसे घेत असल्याचे आरोप आहेत. अनेक वर्षापासून ठिय्या मांडलेले मंडल अधिकारी, तलाठी थेट लुट करत आहेत. त्यांच्यावर नियंत्रण असणारे अधिकारी नेमके करतात काय?,काय तेही यात सामिल आहेत का ?असा सवाल उपस्थित होत आहे.
काही तलाठी,मंडल अधिकारी वाळू तस्कर ?
जत तालुक्यातील काही तलाठी,मंडल अधिकारी वाळू तस्करीत गुंतल्याची चर्चा आहे.तालुक्यात नव्याने अनेक वाळू तस्कर तयार झाले आहेत.एकादे वाळू तस्करी करताना सापडलेले वाहन सोडविण्यासठी अधिकाऱ्यांशी सटेलमेंट करणारीही एक टोळी जत तालुक्यात नव्याने कार्यरत झाली आहे.अशाच्या आर्थिक लालसेच्या मायाजाळात अधिकारी फसले आहेत.त्यामुळे कसेही लुटा असा संदेश महसूल प्रशासनात गेला आहे.