दे धक्का.. जतच्या शासकीय कार्यालयाची वाहने कालबाह्य
जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील शासकीय कार्यालयाकडील अनेक वाहने कालबाह्य झाली आहेत.तर काही व्यवस्थित वापर न झाल्याने नादुरूस्त होत आहेत.
तहसीलदार,बिडिओ,बांधकाम विभाग,पोलीस आदी विभागातील अधिकाऱ्यांची वाहनेही कालबाह्य झालेली आहेत.पर्याय नसल्याने अशी वाहने वापरावी लागत आहेत. यामुळे वेळेचा मोठा दुरूउपयोग होत आहे. शासनाने तालुक्यातील कालबाह्य झालेली वाहने बदलून नवी द्यावीत अशी मागणी होत आहे.
जत पंचायत समितीकडील पाणीपुरवठा विभागाचे वाहन ऐन रस्त्यात बंद पडल्याने दे धक्का म्हणायची वेळ आली होती.