मेंढिगिरीत मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडून शेतकऱ्यांचा मुत्यू
जत,प्रतिनिधी : मेंढिगिरी (ता.जत) येथे शेत तलावाच्या बांधाचा ढिगारा कोसळून घडलेल्या दुर्घटनेत शेतकऱ्यांचा गुदमरून दुर्देवी मुत्यू झाला.बाळासाहेब शिवगोंडा बिराजदार (वय 58) असे मयत शेतकऱ्यांचे नाव आहे.
याबाबत पोलीस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी,
मेंढेगिरी-रावळगुंडेवाडी रस्त्यावर बाळासाहेब बिराजदार यांची रस्त्यालगत शेती आहे.तेथे शेतात पाणी साठवण करण्यासाठी शेततळे बांधण्यात आले आहे.शेततळ्याला गेल्या दिवसापासून गळती लागली होती.ती गळती काढण्यासाठी शिवगोंडा बिराजदार माती काढत होते.

त्यावेळी अचानक त्यांच्या अंगावर ढिगारा कोसळला.ढिगाऱ्याखाली बाळासाहेब बिराजदार सापडले गेले.दरम्यान आजोबाना चहा घेऊन गेलेले आठ वर्षाच्या नातूने बघून आरडाओरडा केल्यानंतर घरातील अन्य लोक धावले,माती काढून बाळासाहेब बिराजदार यांना बाहेर काढले मात्र दुर्देव्याने श्वास गुदमरून त्यांचा मुत्यू झाला.या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.