जत तालुक्यात नवे तीन रुग्ण
जत,प्रतिनिधी : जत शहरासह तालुक्यात मंगळवारी दहा रुग्ण आढळून आल्यानंतर बुधवारी पुन्हा तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.जत शहर 2,बिळूर 1 येथे नवे रुग्ण आढळून आले आहेत.
तालुक्यात 117 गावापैंकी जत,बिळूर येथे नवे कोरोना बाधित आढळले आहेत. तालुक्यात आत्तापर्यंत 241 दिवसात कोरोना बाधित रूग्णांची संख्या 1985 झाली आहे.त्यातील 42 जणावर सध्या उपचार सुरू आहेत.
