हत्याराचा धाक दाखवून जबरी चोरी करणा-या गुन्हेगारांना अटक

0
1



सांगली : हत्याराचा धाक दाखवून जबरी चोरी करणा-या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात आल्या.रेकॉर्डवरील गुन्हेगार समीर रमजान नदाफ रा. नुराणी (मशीदजवळ 100 फुटी रोड सांगली),सैफ मेहमुद पटेल (रा.नळभाग सांगली)यांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.सांगली शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये थर्टी फस्टच्या अनुषंगाने व पोलीस ठाणे हद्दीमध्ये झालेल्या घरफोडी,जबरी चोरी आणि चोरी या गुन्हयातील आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. 






त्यानुसार पो.ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथक गणेशनगर स्विमींग टैंकजवळ या भागात पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी एका अनोळखी इसमास दोन संशयित हे मारहाण करीत पैसे काढून घेत होते,असे दिसून आले त्यापैंकी दोन्ही संशयित समीर नदाफ,सैफ पटेल रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे लक्षात येताच पोलीसांनी त्यांना हाटकले त्यावेळी त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला.





पथकातील कर्मचाऱ्यांनी त्यांचा पाठलाग करत समीर रमजान नदाफ याला ताब्यात घेतले.दुसरा संशयित सैफ मेहमुद पटेल यांस भिलावे खानावळ या परिसरातून ‌ताब्यात घेतले.त्यांच्याकडे या घटनेबद्दल चौकशी केली असता त्यांनी शहर पोलीस ठाणे हद्दीत दोन ठिकाणी चोऱ्या केल्याचे पोलीसांना कबूली दिली आहे.दोन्ही आरोपी पोलीस रेकार्डवरील गुन्हेगार आहेत.



सांगली : अटक‌ केलेल्या गुन्हेगारासह पोलीस पथक

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here