गाडीच्या सीटखाली कोयता घेऊन फिरणाऱ्यांस अटक
सांगली : सांगलीत गाडीच्या सीटखाली कोयता घेऊन फिरणाऱ्यांस पोलीसांनी अटक केली. सुशांत प्रकाश कांबळे वय 25,रा.रामनगर,दुसरी गल्ली सांगली, सध्या सुभाषनगर मिरज)याला अटक केली आहे.
सांगलीतील खणभाग बदाम चौक परिसरात पोलीसाचे पथक गस्त घालत असताना सुशांत कांबळे हा संशयास्पद फिरताना आढळून आला त्याच्याकडे दुचाकीची कागदपत्राची पोलीसांनी चौकशी केली असता त्याला माहिती देता आली नाही.त्यामुळे संशय आल्याने त्यांच्या दुचाकीची झडती घेतली असता गाडीच्या सीटखाली धारदार कोयता मिळून आला.त्यानुसार बेकायदा हत्यार बाळगणे,अधि.4,25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापुर्वीही कांबळे यांच्यावर सन 2016मध्ये आर्म अँक्टनुसार गुन्हा दाखल आहे.

सांगली येथे गाडीच्या सीटखालून जप्त केलेले कोयता