जतेतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यानाचे काम गतीने

0जत,प्रतिनिधी : जत शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यानाचे शुशोभीकरण नगरपरिषदे कडून करण्यात येत आहे. अनेक दिवसापासून रखडलेल्या उद्यानाच्या जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे.उर्वरित जागेमध्ये संरक्षण भिंत,आतील स्वच्छता मुरमीकरणाची कामे सुरू आहेत.नगरपरिषदेचे शिक्षण सभापती भूपेंद्र कांबळे यांच्या पाठपुराव्यामुळे शहरातील मध्यवर्ती डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यानाची विकास,सुधारणा गतीने सुरू आहे.आतील मैदानाचे मजबूतीकरणासह काही बांधकामे करण्यात येणार आहेत.
त्याशिवाय समोरची बाजूचेही शुशोभिकरण करण्यात येणार आहे.नुकतीच कांबळे यांनी भेट देत कामासंदर्भातील सुचना दिल्या.

Rate Card

शहरातील महत्वाचे डॉ.बाबासाहेब आंबडेकर उद्यानाचे काम रखडले होते.आंबेडकर जनतेचे वैभव असलेल्या उद्यानाचे विकास करण्यात येत आहे. भविष्यात शहरातील महत्वाचे स्थान हे उद्यान ठरले,असे नियोजन आहे.असे भूपेंद्र कांबळे यांनी सांगितले.


जतेत सुरू असलेल्या डॉ.बाबासाहेब उद्यान बांधकामाची पाहणी नगरसेवक भूपेंद्र कांबळे यांनी केली.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.