ज्ञानदानाचे पाविञ्य जपा | जतच्या प्रकाराने प्रतिमेला तडा | जिल्ह्यातील कारवाईकडे लक्ष

0



जत,प्रतिनिधी : जि.प.प्रा.मराठी शाळा नं 2 मधिल मुख्याध्यापक व सहशिक्षक व शिक्षिका यांच्या मधिल वाद हा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात पोहोचला असून ज्ञानदानासारखे पवित्र काम करणारे गुरूजींचा हा वाद स्थानिक पातळीवर सोडविण्यात स्थानिक प्रशासन अपयशी ठरल्याने स्थानिक प्रशासनाविषयी सबंधित शाळेतील विद्यार्थी व त्यांचे पालकांनी नाराजी व्यक्त केली असून अशा शिक्षकांकडून कोणता आदर्श घ्यावा अशी चर्चा पालकवर्गातून होताना दिसत आहे.







या शाळेतील‌ सर्व शिक्षकांची बदली‌ करा,असे निवेदनही पालकमंत्री जयंत पाटील यांना देण्यात आले आहे.जत येथिल जि.प.प्रा. मराठी शाळा नं.2 ही शाळा अलिकडे शाळेतील शिक्षकांमुळे चर्चेत आली आहे. या शाळेत मुख्याध्यापकासह एकूण चार शिक्षक आहेत.या शिक्षकामध्ये शिक्षक संघटनेचा अध्यक्ष आहे.तर दुसरी शिक्षिका ही अपंग आहे.तर अन्य एक शिक्षक आहे.







असे असले तरी अपंग असलेली शिक्षिका ही या शाळेत जवळ जवळ दिडवर्षाहुन अधिक काळ रजेवर आहे.यामध्ये तीन चार वेळा तीने बालसंगोपन रजा घेतल्या आहेत.व अर्जीत रजा ही घेतलेल्या आहेत.यामुळे ही शिक्षीका वर्षभराहून अधिक काळ रजेवर असल्याने तसेच दुसरे शिक्षक हे शिक्षक संघटनेचे अध्यक्ष असल्याने शाळेच्या गुणवत्तेवर मोठा परिणाम झाला आहे.



Rate Card






शाळेचे मुख्याध्यापक हे कशीबशी शाळा संभाळत आहेत.सद्या शाळा बंद असल्याने या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देणे तसेच शालेय पोषण आहाराचे वाटप करणे आदी जबाबदारी पार पाडत असतानाच या शाळेतील दिव्यांग शिक्षिकेने मुख्याध्यापक हे मला दिव्यांगावरून बोलतात.माझा अपमान करतात. ते मला त्रास देतात अशा तक्रारी तालुका शिक्षण विभाग व जिल्हा परिषदेकडे लेखी निवेदनाद्वारे केल्या आहेत.मुख्याध्यापकांनी चुकीचे आरोप असल्याचा खुलासा केला आहे.

दरम्यान जेथे‌ ज्ञानदानाचे पवित्र काम होण्याची गरज आहेत.तेथे खालच्या पातळीवर जाऊन ज्ञानदात्याकडून आरोप-पत्यारोप होणे शिक्षण क्षेत्राला शोभनीय नसल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.








या तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात या तक्रारींची चौकशी करण्यात आली.चौकशी दरम्यान मुख्याध्यापक व तक्रारदार शिक्षकांच्या बाजू समजून घेण्यात आल्या आहेत.अजून कोणती कारवाई होणार याबाबत स्पष्टता नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.