डफळापूर आरोग्य केंद्रात रुग्णाची हेळसांड
डफळापूर, वार्ताहर: डफळापूर ता.जत येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रूग्णाची हेळसांड होत असून बाहेरून औषधे आणले तर उपचार अन्यथा खाजगी दवाखान्यात जावा म्हणून सांगण्यात येत आहे.याप्रकरणी केंद्रातील अधिकारी कर्मचाऱ्यांची खातेनिहान चौकशी करा अशी मागणी बेंळूखी येथील माजी ग्रा.प.सदस्य शिवाजी चंदनशिवे यांनी केली आहे.तसे निवेदन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठविले आहे.
निवेदनात म्हटले आहे कि, माझी मुलगी व सून प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी गेले होते.पहिल्या तपासणीत रक्त कमी आहे.ते वाढीसाठी उपचार करण्याची मागणी केली असता औषधे उपलब्ध नाहीत,बाहेरून आणा नाहीतर खाजगी दवाखान्यात जावा म्हणून कर्मचाऱ्यांनी सांगितले.त्यानंतर तक्रारदार चंदनशिवे यांनाही तसाच अनुभव आला.
काही दिवसानंतर परत मुलगी उपचारासाठी गेली असता पुन्हा औषधे बाहेरून आणा नाहीतर खाजगी दवाखान्यात जावा असे सांगण्यात आले. शासनाने कोट्यावधी खर्चून सरकारी रूग्णालये उभारून अशी परिस्थिती असेलतर गरीबांनी जायाचे कुठे असा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रकाराची खातेनिहान चौकशी करून संबधितावर कारवाई करावी,अन्यथा केंद्रासमोर उपोषणास बसू असा इशारा शिवाजी चंदनशिवे यांनी दिला आहे.