बनाळीत हवेच्या कॉम्प्रेन्सरचा स्फोट
जत,प्रतिनिधी : बनाळी ता.जत येथील दत्ता सांवत यांच्या पक्चर काढण्याच्या दुकानातील हवेच्या कॉम्प्रेन्सरचा स्फोट झाला.सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.मात्र दत्ता सांवत हे गंभीर जखमी झाले आहे.दुकानातील साहित्याचे स्फोटामुळे मोठे नुकसान झाले आहे.

बुधवारी सकाळी दत्ता सांवत हे नेहमीप्रमाणे आपले मोटारसायकल पक्चर काढण्याचे दुकान उघडून मोटारीद्वारे कॉम्प्रेन्सरमध्ये हवा भरत असताना कॉम्प्रेन्सर अचानक फुटल्याने मोठा स्फोट झाला.अचानक घडलेल्या या घटनेने नागरिक सांवत यांच्या दुकानाकडे धावले.सुदैवाने सांवत सावध झाल्याने बचावले.मात्र त्यांच्या पाठीला दुखापत झाली आहे.स्फोटामुळे दुकानातील साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे.गरीब होतकरू असलेल्या सांवत यांना दानसुरानी मदत करावी,असे आवाहन नागरिकांनी केली आहे.