जत | पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालणाऱ्या तिघावर कारवाई

0जत,प्रतिनिधी : जत शहरातील बिजरग्गी पेट्रोलपंपावर तेल टाकून पैसे न देता आरडाओरडा करून दंगा करणाऱ्या तिघावर जत पोलीसांनी कारवाई केली.याप्रकरणी पोलीस कर्मचारी केरबा चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विजय महिंद्र कांबळे (वय 21,रा.विठ्ठलनगर जत),रोहन बसवंत मेलगडी (वय 21,रा.कोल्हापूर),आदित्य विनय वाघमोडे (वय 19,रा.विठ्ठलनगर जत) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी, जत शहरातील स्टँड नजिकच्या बिजरग्गी पेट्रोलपंपावर संशयित तिघेजण काळ्या रंगाची लेन्सर चारचाकी क्रं.एमएच- 02,एल- 8165 या गाडीत बसून कर्मचारी विठ्ठल कलाल यांना तेल टाकलेले पैसे देत नाही,तुला काय करायचे ते कर म्हणून वाद घालत होते.


Rate Card

मोठ्या मोठ्या आरडाओरडा करत असताना जत पोलीसाच्या पेट्रोलिंग करणाऱ्या टिमने हा प्रकार बघून त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी मादक द्रव्याचे सेवन करून असा प्रकार करत असल्याचे समोर आल्याने पोलीसांनी त्यांना ताब्यात घेत वैद्यकीय तपासणी करून महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 चे कलम 85(1),85(2)मोटार वाहन कायदा कलम 185, व महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 110,112 सह 117 अन्वये ही कारवाई करण्यात आली आहे. संशयित तिघा तरूणांना प्रतिबंधित कारवाई करून रात्री उशिराने सोडून देण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.