जमिनीच्या वादातून खून करणाऱ्या आरोपीस जन्मठेपेची शिक्षा
सांगली : जमिनीच्या वादातून खून करणा-या आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली.सदरचे काम सांगली येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. पी. व्ही. पाटीलसाहेब यांचेसमोर चालून यातील आरोपी सुखदेव बालक घागरे,(वय ५० वर्षे, रा. पुजारी वस्ती, ढालगाव, जि. सांगली) यास भारतीय दंड संहिता कलम ३०२ अन्वये दोषी धरून जन्मठेप व रक्कम रुपये ५०००/- दंड, दंड न दिल्यास सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. याकामी सरकारपक्षातर्फे जिल्हा सरकारी वकिल श्री. अरविंद आर. देशमुख व अति.सरकारी वकिल श्रीमती आरती देशपांडे (साटविलकर) यानी काम पाहिले.
यात थोडक्यात हकीकत अशी की, फिर्यादी व त्यांचे चुलते हे २५ एकर जमीन कुळ कायद्याने कसत होते. त्या जमिनीपैकी आरोपी व इतर लोकांनी साडेबारा एकर जमीन दोन वर्षापूर्वी जमीन मालकाकडून खरेदी केली होती, त्या संदर्भात फिर्यादी यांनी आरोपी व इतर जमीन खरेदीदारांच्या विरोधात दिवाणी न्यायालयात व प्रांत कार्यालयात दाचे दाखल केलेल असून ते न्यायप्रविष्ठ होते. सदर जमिनीच्या वादातून त्यांच्यामध्ये मारामारी होवून एकमेकांविरुध्द कॉस कप्लेंट आहेत.
दिंनाक ०२/०५/२०१६ रोजी सायंकाळी ०६.०० वाजणेचे सुमारास फिर्यादी हे रस्त्यावर व्यायाम करण्यासाठी गेले असता, त्यांना काही अंतरावर त्यांचा चुलतभाऊ श्रीमंत दामू पुजारी व आरोपी यांच्यामध्ये जोरजोराने शाब्दिक वाद सुरु असल्याचे त्यांनी पाहिले. त्यावेळी आरोपी सुखदेव घागरे याच्या हातात कु-हाड होती. त्यावेळी फिर्यादी हे पाहण्यासाठी पुढे गेले असता आरोपी शंकर घागरे यांनी मयत श्रीमंत पुजारी यांचा डावा हात पकडला व सुखदेव घागरे याने श्रीमंत पुजारी यांच्या पाठीमागून डोक्यात कु-हाडीचा घाव घातला त्यामुळे ते मयत झाले.

त्यानंतर फिर्यादी यांनी आरोपीविरुध्द फिर्याद नोंदविली. त्यानंतर आरोपींना अटक करण्यात आली.याकामाचा सखोल तपास होवून श्री. क्षिरसागर तपासी अधिकारी यांनी मे.कोर्टात आरोपपत्र दाखल केले.सदर सेशन, केसची सुनावणी प्रमुख जिला न सत्र न्यायाधीश श्री. व्ही. व्ही. पाटील यांचे न्यायालयात सुरु होती. याकामी सरकार पक्षातर्फ एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले.
याकामी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार,वैद्यकिय पुरावा व इतर, कागदोपत्री पुरावा
यांचा विचार करण्यात आला व उपलब्ध साक्षी पुराव्याचे आधारे यातील आरोपी सुखदेव बाळकू घागरे यास शिक्षा सुनावली. सदरकामी पैरवी कक्षातील सर्व पोलीस अमलदार व कवठेमहंकाळ पोलीस स्टेशनचे संबधित अंमलदार यांचे सहकार्य लाभले.