जतेत सात दिवसात 9 नवे रुग्ण
जत,प्रतिनिधी : ब्रिटनमध्ये आलेल्या नव्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जत तालुक्यात कोरोनाचा प्रभाव नियंत्रणात आहे.तालुक्यात सतर्क प्रशासकीय यंत्रणामुळे गेल्या पंधरा तारखेपासून मंगळवार पर्यत फक्त 9 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

त्यात ता.15 ला कोंतेबोबलाद 2,ता.16 ला जत 2,ता.17 ला जत 1,ता.18 ला नवाळवाडी 1,ता.19 ला शून्य,ता.21 ला जत 1,ता.22 ला जत 2 येथे नवे रुग्ण आढळून आले आहेत.
दरम्यान जत तालुक्यात कोरोनाच्या लसीचे लसीकरण करण्याचे प्रशिक्षण काही कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे. कसे करायचे तालुक्यात लसीकरण याबाबत वरिष्ठ कार्यालयाकडील सुचनेनुसार लसीकरण करण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.