मोटेवाडी दोन झोपड्यांना आग | सुमारे साडेचार लाखाचे नुकसान
जत,प्रतिनिधी : मोटेवाडी ता.जत येथील भाऊसो आप्पा सरक,नामदेव आप्पा सरक या बंन्धूचे लगत असणारी झोपड़ी वजा घराला आग लागून सुमारे साडेचार लाख रूपयाचे नुकसान झाले आहे.
मोटेवाडी येथे राहणारे सरक बन्धू यांची लगत घरे आहेत.रविवारी सकाळी त्यांच्या घरास आग लागली.त्यात सात तोळे सोने,रोख साठ हजार रूपये संसारउपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे.

अचानक झालेल्या या घटनेमुळे सरक बंन्धूचे कुंटुबिय उघड्यावर आले आहे.आग नेमकी कशाने लागली हे अद्याप समजू शकले नाही.मात्र आगीच्या भडक्याने दोघांच्या झोपड्या जळून खाक झाल्याचे आहेत.महसूल प्रशासनाकडून घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे. कष्टाळू सरक बंन्धूच्यावर झालेल्या या आघाताने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.शासन व दानशूर व्यक्तीनी मदत करावी,असे आवाहनही करण्यात आले आहे.