विट्यातील चोरीचा छडा | दोन चोरट्यांना अटक

0विटा : विटा ता.खानापूर येथील घरफोडी प्रकरणातील दोघा संशयितांना पकडत‌ विटा पोलीसांनी चोरीचा छडा लावला आहे. याप्रकरणी हेमा धर्मु चव्हाण (वय 27,रा. लक्ष्मीनगर, विटा),नंदा रमेश चव्हाण वय 45, रा. लक्ष्मीनगर, विटा असे अटक केलेल्या संशयिताची नावे आहेत.
पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी,तुप्ती रविंद्र लिमये रा. शाहुनगर विटा यांचे 9 नोव्हेंबर ला बंद घर फोडून सोने,चांदीचे दागिण्याची चोरी झाली होती.त्याचा तपास करण्याचे आवाहन पोलीसा समोर होते,अखेर सांगली येथील सराफ कट्टा ‌येथे दोन महिला सोने-चांदीचे दागिणे विकण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती.

त्या आधारे महिला पोलीसाचा सापळा लावला होता.त्यावेळी तेथील नागोबा मंदिर चौकामध्ये हेमा चव्हाण,नंदा चव्हाण या संशयास्पद फिरताना आढळून आल्याने त्यांना हाटकत चौकशी केली असता,त्यांनी शाहूपुरी विटा येथून आम्ही दोघींनी बंद‌ घर फोडून चोरी केल्याची कबूली पोलीसांना दिली आहे. Rate Cardत्यांनी त्यांच्याकडील 1,44,080 रूपये किंमतीचे 2 किलो 180 ग्रँमचे चांदीचे ताटे,पुजेचे साहित्य विशाल जवळे (रा.24 कँरेट बिल्डिंग विटा ता.खानापूर यांना विकल्याचे सांगितले.गुन्ह्यातील सोन्याचे दागिणे पंचनामा करून विटा पोलीसांच्या ताब्यात दिले आहे.

सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांचे मार्गदर्शानाखाली पोलीस उपनिरीक्षक,अभिजीत सावंत,सपोफी मारूती सांळुखे, सुनिल चौधरी,जितेंद्र जाधव,मच्छिंद्र बर्डे,राहुल जाधव,सोहेल कार्तियानी,अजय बेंद्रे,शुभांगी मुळीक,विमल नंदगावे,कॅप्टन

गुंडवाडे यांच्या पथकाने केली आहेत.
सांगली : पकडलेल्या मुद्देमालासह पोलीस पथक

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.