धावडवाडीतील अनेक नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश | ग्रामपंचायतीत सत्ता आणणार ; उत्तम चव्हाण
जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील धावडवाडी येथील अनेक प्रमुख कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील व राष्ट्रवादीचे जत तालुका कार्याध्यक्ष उत्तम चव्हाण यांनी कसबे डिग्रज येथे आयोजित कार्यक्रमामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश दिला.15 जानेवारीला धावडवाडी ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक आहे.
या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या प्रवेशामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे तुल्यबळ पॅनेल ग्रामपंचायत निवडणूक लढवणार
आहे.यानिमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस धावडवाडी येथे बळकट होणार असल्याचे चित्र आहे. कसबे डिग्रज

येथील कार्यक्रमात प्रवेश सोहळा संपन्न झाला.याप्रसंगी पिरसाहेब कासिम शेख,अशोक सुतार, बाळासाहेब म्हमाने,बादशाह शेख,इस्माईल कोरबू,समशेर शेख, रफिक गुलाब शेख,शब्बीर अजमुद्दिन शेख या सर्व कार्यकर्त्यांनी प्रवेश केला.
पालकमंत्र्यांच्या सूचनेप्रमाणे व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष उत्तम चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली धावडवाडी ग्रामपंचायतीत राष्ट्रवादी कॉग्रेसची सत्ता आणू,असा विश्वास राष्ट्रवादी प्रवेशानंतर मान्यवरांनी व्यक्त केला.यापुढे तालुक्यातील मोठा नेत्याचा प्रवेश सोहळा होणार असल्याचे यावेळी उत्तम चव्हाण यांनी सांगितले.तालुक्यात राष्ट्रवादीला गतवैभव आणू असा विश्वासही चव्हाण यांनी व्यक्त केला.