माडग्याळमध्ये दलित वस्ती निधीचा गैरवापर | हायमास्ट इतत्र लावले | आँल इंडिया युथ पँथर सेनेचे निवेदन
माडग्याळ,वार्ताहर : दलितवस्ती सुधार योजनेतील एलइडी हायमास्ट इतर ठिकाणी बसविले कामाची चौकशी करून हायमास्ट दलित वस्तीत बसवावेत अशी मागणी आँल इंडिया युथ पँथर सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि,माडग्याळ ता.जत येथे सल 2018,2019 सालच्या दलितवस्ती सुधार योजना अंतर्गत जिल्हा परिषद सांगली (समाज कल्याण विभाग)यांच्याकडून मंजूर झालेला निधीतून एलइडी हायमास्ट निवीदा क्र. 2082272 रक्कम रुपये 3,99,534 रूपयाचे काम फस्टग्रीन एनर्जी सोलर शाँपी सांगली कंपनीकडून करण्यात आले आहे.
हे हायमास्ट दलितवस्तीत न वापरता इतत्र बसविण्यात आले आहेत.दलित वस्ती सुधार योजनेचा निधी चुकीच्या ठिकाणी वापरला आहे.यातील दोषीवर कारवाई करून हायमास्ट दलित वस्तीत लावण्यात यावेव,अन्यथा आँल इंडिया युथ पँथर सेना तीव्र आंदोलन करेल असे निवेदनात म्हटले आहे.निवेदन गटविकास अधिकारी,संरपच यांना देण्यात आले आहे.अमर कांबळे,गिरिष सर्जे,विकी वाघमारे,प्रविण बाबर,कासू माळी,सुनील कोळी,लोकेश कांबळे,दादा करगणीकर,संतोष कांचनकोटे आदी उपस्थित होते.
माडग्याळ ता.जत येथील हायमास्ट कामाची चौकशी करण्याच्या मागणीचे निवेदन संरपच अप्पू जत्ती यांना देण्यात आले.