संखमध्ये विद्युत खांब कोसळलासुदैवाने जीवित हानी टळली | खालावलेल्या विद्युत वाहिन्याचा प्रश्न ऐरणीवर
जत,प्रतिनिधी : संख ता.जत येथे मालवाहतूक करणाऱ्या ट्रकच्या छताला वीज वाहिन्या अडकल्याने लगतचा सिमेंटचा विद्युत खांब मोडून पडला.सुदैवाने जीवित हानी टळली.
अधिक माहिती अशी,संख मधील जून्या बसस्थानकानजिक रस्त्या कडेला काही व्यापारी तुरी खरेदीसाठी दुकान लावून बसले होते.त्यादरम्यान तेथे असणाऱ्या एका खत दुकानातील सांगली येथून खते घेऊन आलेला ट्रक (एम एच 10/एफ सी 8416) हा रस्त्याच्या बाजूने घेत असताना लगतच्या विद्युत वाहिनी ट्रकच्या छतात अडकल्याने ओड लागल्याने वाहिनेला जोडलेला सिमेंटचा विद्युत खांबत खाली कोसळला.

तेथेच काही शेतकरी तुरी घालण्यासाठी उभे होते.मात्र अचानक आवाज झाल्याने शेतकरी बाजूला धावल्याने जीवित हानी टळली.मात्र यामुळे गावभागातील विद्युत वाहिन्या उंचावर जोडण़्याची गरज स्पष्ट झाली आहे.अनेक वर्षापुर्वी जोडलेल्या विद्युत वाहिन्या खाली झुकत आहेत.त्यामुळे ट्रक सारख्या अवजड वाहनचा स्पर्श होत आहे.भविष्यातील धोका टाळण्यासाठी गावभागातील विद्युत वाहिन्याचा ताण काढावा अशी मागणी होत आहे.